international smart
city is comming
perfection and class
at best prices
of lavish lifestyle and
structures






!! श्री व्यंकटेश मानव सेवा चॅरिटेबल ट्रस्ट !!
गृप करण्यामागचा उद्देश किंवा संकल्पना काय ? तर हा गृप करताना काही विचार किंवा काही गोष्टी डोक्यात होत्या,सामाजिक जीवन जगत असताना आपण आजूबाजूला पाहतो कित्येक वृद्ध माणसे दोघतिल् एक जोडीदार गेल्यावर उदास मन मारून जीवन जगत असतो,एक तर लग्न करायचे धाडस नसते किंवा समाजाची भीती कि समाज काय म्हणेल घरचे विरोध करतील हि पण भीती म्हणजे नुसती भीतीच भीती ,बर सगळ्यांनाच पेन्शन असेलच असेही नाही, मुलांना पैसे मागायची पण लाज वाटते, हा झाला पुरुषाचा प्रश्न ,आता महिला त्यांचे प्रश्नच वेगळे त्यांना पेन्शन असेल तर ठीक पण नसेल तर पुनर्विवाहाचा जोडीदार जबाबदाऱ्या घेईल का याची खात्री नाही यात पण अडचणी खूप, म्हणून आपण व्रूध्दाश्रमाची संकल्पना आखलेली आहे यामध्ये आपण छ्न्द जोपासत आहोत.
1)महिलासाठी वीणकाम, भरत कामं, पेंटिग, शिवण कामं,वाती वळने इत्यादी बर इतकंच करून थांबणार नाही तर त्यांना एक प्लॅटफॉर्म देणार आहोत त्यात त्यांनी तयार केलेल्या वस्तू विकून आलेला पैसा त्यांनाच देणार आहोत,त्यांना आत्मनिर्भर असल्यासारखे वाटेल.
2)पुरुष लोक आवड असेल तर बागकाम करतील किंवा भजन कीर्तन किंवा इतर काही छंद जोपासले जातील.
3)आणखी एक संकल्पना अशी आहे कि ज्या मुलींचे लग्न झालेय पण आईवडील नाहीत भाऊ वहिनी त्या मुलीचे माहेर पण करतील असे नाही तर आपण त्या मुलीला माहेर पण देणार आहोत यात ती चार आठ दिवस आपल्या कडे राहील आपण तिचा योग्य तो मानपान करून (साडी चोळी बांगडी इत्यादी)तिची पाठवणं करू.
4)ज्या कोणाला इच्छा असेल एखाद्या अनाथ मुलीला बहीण मानायची तर त्याने तिच्या कडून राखी बांधून किंवा भाऊ बिजेला ओवाळून घेऊन वाटले तर एखादी भेटवस्तू देऊ शकतो (आग्रह नाही ) यात अनाथ मुलीला भाऊ मिळाल्याचा आनंद शब्दात सांगता येणार नाही आणि भावाला बहीण मिळेल.
5)ज्या मुलांना खरेच कोणीही नाही अनाथ आहेत अशा मुलांचा शिक्षणाचा थोडाफार खर्च आपण उचलू.
6)आता माझा जिव्हाळ्याचा विषय , मुके प्राणी ज्यांना भूक लागते पण मागता येत नाही, तहान लागलीये पण सांगता येत नाही, दुखतय पण बोलता येत नाही अशान साठी भूतदया म्हणून काहीतरी करू या ,माहिती नाही पुढचा जन्म कोणता आहे पण पुढील जन्मा साठी थोडेसे पुण्य कमवू या , आता आहोत उद्या आहोत कि नाही माहिती नाही ,चला तर सामाजिक बांधिलकी जपुया.
ट्रस्ट अंतर्गत सामाजिक कार्य

कोरोना काळात मोफत लसीकरण आणि धान्य वाटप

दिवाळीत फराळाचे किट वाटप

पाणी प्रश्नासाठी हंडा बजाव

रस्त्यासाठी आयुक्तालयात आयुकांची आणि आमदार खासदारांची भेट

प्राण्यांचे लसीकरण मोहीम आणि त्यांच्यावर इलाज

महिलेला न्याय मिळावा म्हणून पोलिसात तक्रार